Views: 460
कल्याण : रिक्षात विसरलेला मोबाईल रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे प्रवाशाला परत केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे.
म्हारळ येथे राहणारे नरेश भगत हे प्रवाशी कल्याण स्टेशन ते उल्हासनगर दरम्यान प्रवास करत असताना सॅमसंग कंपनीचा वीस हजार किमतीचा मोबाईल रिक्षात चुकुन विसरले. भगत यांच्या मोबाईल फोन मध्ये महत्वाचा डाटा व अत्यावश्यक नबंर सेव होते. मोबाईल हरविल्यामुळे ते चितांतुर झालेले त्यांनी कल्याण स्टेशन वर लोहमार्ग वाहतुक पोलिसांना घडलेला प्रकार कथन केला.
याबाबतब चौकशी केली असता समजले की, रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते तथा रिक्षाचालक अरविंद भोसले यांच्या रिक्षात हा मोबाईल हे प्रवासी विसरले होते. रेल्वे वाहतुक पोलिस अमलदार मंगेश भोसले, गोपाळ सावंत यांच्या समक्ष रिक्षाचालक अरविंद भोसले यांंनी प्रामाणिकपणे प्रवाशी नरेश भगत यांना मोबाईल परत केला. अरविदं भोसले यांचे रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष प्रणव पेणकर व पदाधिकारी यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.



