टिटवाळयातील विद्यार्थ्यांची स्केटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी

Views: 470
शेअर करा:

कल्याण : एम. के. कला व क्रीडा मंडळाच्या वतीने सोमय्या महाविद्यालयाच्या स्केटिंग रींक वर पहिली खुली स्पीड स्केटिंग स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुमारे ६५० स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

     टिटवाळा येथे विनायक मार्शल आर्ट आणि फिटनेस झोन च्या स्केटिंग अकादमी मध्ये स्केटिंग प्रशिक्षक समाधान कोंडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असलेल्या ७ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होऊन विविध पदक प्राप्त केले. त्यांपैकी विहान जाधव तृतीय क्रमांक, आराध्य कवठले आणि चिन्मय प्रभू चतुर्थ क्रमांक, ध्रुव वानखेडे, लक्ष जाधव आणि नैतिक रावत यांनी पाचवा क्रमांक पटकावला. स्केटिंग प्रशिक्षक समाधान कोंडवळे देखील या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनी देखील आपले कौशल्य सादर करत चतुर्थ क्रमांक पटकावला. या सर्व स्पर्धकांसोबत स्केटिंग प्रशिक्षक गणेश रायते संघ व्यवस्थापक म्हणून उपस्थित होते.

 विनायक मार्शल आर्ट आणि फिटनेस झोनच्या स्केटिंग अकादमीचे संचालक आणि राज्य युवा पुरस्कार विजेते विनायक कोळी आणि क्रीडा प्रशिक्षक हरीष वायदंडे यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले व स्केटिंग या खेळात भविष्यात अनेकानेक स्पर्धा खेळण्यासाठी प्रोत्साहन पर शुभेच्छा दिल्या. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत