Views: 387
कल्याण : कल्याणातील कोळसेवाडी वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी, वाहतूक पोलीस, कर्मचारी यांच्या तणावमुक्त जीवन शैलीसाठी ताणतणाव व्यवस्थापन स्ट्रेस मॅनेजमेंट विषयी सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
वाहतूक शाखेत काम करणार्या अधिकारी, वाहतूक पोलीस, कर्मचारी यांना वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक नियमाची पायमल्ली करणार्या कारवाईचा बडगा उचलणे अशी कर्तव्य पार पाडत असताना ताणतणाव मुक्त राहण्यासाठी कसे व्यवस्थापन करीत कसे ताणतणाव मुक्त व्हावे याबाबत मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्यातर्फे डॉक्टर प्रतिभा पवार यांनी क्रार्यक्रम सादर करीत मार्गदर्शनपर माहिती सादर केली. या सत्राचा शहर वाहतूक शाखा कल्याण कोळशेवाडी येथील अधिकारी व अंमलदार, कल्याण वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश तरडे यांनी लाभ घेतला.



