Views: 526
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे थेट दिल्लीत
कल्याण : विधानसभा निवडणुकीत महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळणार असून महिला कार्यकर्त्यांना देखील उमेदवारी देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे थेट दिल्लीत दाखल झाल्या आहेत.
काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळामध्ये एकनिष्ठेने आणि पूर्ण ताकदीने असंख्य महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वात चांगले कार्य केले आहे. अशा महिलांना येणाऱ्या विधानसभेमध्ये उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे प्रभारी मुकुल वासनिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानी संध्या सव्वालाखे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी प्रबळ दावा करत कल्याण पश्चिम विधानसभा मधून महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, लातूर औसा विधानसभा मधून प्रदेश महिला उपाध्यक्ष विद्या पाटील, छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मधून दिपाली मिसाळ, अकोला पूर्व विधानसभा मधून पूजा काळे, नागपूर उमरेड विधानसभा मधून प्रतिमा उके आणि त्याच बरोबर यवतमाळ विधानसभा मधून स्वतः संध्या सव्वालाखे अशा जवळपास महाराष्ट्रातून १५ महिलांसाठी उमेदवारी मागितली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या. इच्छुक महिला उमेदवारांनी आपल्या कामाचा आढावा मुकुल वासनिक यांच्याकडे दिला.



