Views: 614
ठाणे जिल्हा हिंदू खाटिक मागासवर्गीय सेवा समाज तर्फे तहसीलदारांना निवेदन…
कल्याण : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त दिल्लीतील महाराष्ट्र सदनात कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला भाजप-शिवसेनेचे खासदारही उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तात्पुरत्या स्वरूपात हटवण्यात आल्याने सध्या विरोधक आक्रमक झाले असून सर्वत्र निषेध व्यक्त करत आंदोलन करत असल्याचे दिसून येत आहेत. त्यातच अत्ता खाटीक समाज ही आक्रमक झाला असून त्यांनी देखील राज्य सरकारचा निषेध केला आहे.
समाजसुधारक तसेच कर्तबगार महिला म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे पहिले जाते. आज महिल्या शिकून नोकरी व्यवसायात विविध पद भूषवत आहेत ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशभर पुण्यकर्म केले आहे. त्यामुळे दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील स्वा. सावरकर यांच्या जयंतीच्या वेळी पुतळे हटवणे योग्य नसल्याने महाराष्ट्रात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच कल्याणात खाटिक समाज आक्रमक झाला असून पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे जाणून बुजून हटवून त्यांचा अपमान केल्याबद्दल ठाणे जिल्हा हिंदू खाटिक मागसवर्गीय सेवा समाज तर्फे संबधितांवर कारवाई करण्याचे निवेदन कल्याण तहसीलदारांना देण्यात आले आहे.
यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर निकम, कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश लाड, पदाधिकारी शिरीष लासुरे, समीर मानकर, सुरेश घोणे, मनोज कांबळे, शशिकांत खराटे, रमेश खराटे, प्रथमेश घोडके, विजय घोलप हे उपस्थित होते.



