केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

Views: 592
शेअर करा:

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगी शिवाय सुरु असलेल्या ७ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शाळांमध्ये  विबग्यार राईझ स्कूल, वसंत व्हॅली रोड, कल्याण पश्चिम, ओमकार इंटरनॅशनल स्कूल, ९० फूटी क्रॉस रोड, खंबाळपाडा, डॉबिवली (पूर्व), ऑचिड इंटरनॅशनल स्कूल, नांदिवली रोड, डि.एन.सी विद्यामंदीर संकुल, नांदिवली रोड, डॉबिवली (पूर्व), डी.बी.एस हिंदी अॅन्ड इंग्लिश स्कूल, संतोषी माता मंदीराजवळ, आंबिवली (पश्चिम), ईकरा इंग्रजी स्कूल अॅन्ड मक्तब, सर्वोदय सृष्टी, कल्याण (पश्चिम), लिटल वंडर प्रायमरी स्कूल, मांडा टिटवाळा, दि. बुध्दीस्ट इंटरनॅशनल स्कूल, बिर्ला कॉलेज रोड, कल्याण (पश्चिम) या ७ शाळांचा समावेश आहे.

सर्व संबंधित पालकांनी या अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत. शासनमान्य अधिकृत शाळेत प्रवेशासाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी व्ही. व्ही. सरकटे यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत