मलंग गड परिसरातील कुशिवली धरणाला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा सकारात्मक प्रतिसाद

Views: 387
शेअर करा:

कल्याण : मलंग गड परिसरातील कुशिवली धरणाला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आज मी कल्याणकर सामाजिक संस्थेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना लेखी निवेदन देऊन हा प्रकल्प मार्गी लावण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक व मी कल्याणकार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम, जागरूक मंचचे श्रीनिवास घाणेकर आणि पत्रकार किरण सोनावणे उपस्थित होते.

 कल्याण डोंबिवली शहरात भविष्यात होणारी पाणीटंचाई लक्षात घेता कुशीवली धरण होणे ही काळाची गरज आहे. गेली १५ ते २० वर्षांपासून मलंगगड पायथ्याशी मंजूर असलेले व कल्याण पूर्व व  कल्याण ग्रामीण येथील  नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल  अशा मलंग गड पहाड़ाच्या लगत असणारा कुशिवली धरणाचा विषय थंड बस्त्यात गेला होता. या विषयावर गेल्या अनेक महिन्यांपासून मी कल्याणकर हि सामाजिक संघटना या धरणाचे काम का बंद पडले ? व या धरणाचे काम सुरू करण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना भेटून माहिती घेत आहे.

हा विषय ३ महिन्यांपूर्वी कल्याण – डोंबिवली महापालिका आयुक्त यांच्याकडेही घेतला होता. आयुक्तांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. या धरणामुळे कल्याण ग्रामीण व कल्याण पूर्वेतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकतो आणि स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊन मलंग गड तीर्थक्षेत्राला पूरक देखील होऊ शकतो.  हे लक्षात आल्यावर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री, स्थानिक खासदार, स्थानिक निवासी, सामाजिक कार्यकर्ते, २७ गाव संघर्ष समिती यातील काही पदाधिकाऱ्या सोबत चर्चा देखील केली.

     जिल्हाधिकारी यांनी सुमारे अर्धा तास याविषयी चर्चा केली आणि हा प्रकल्प लवकरच जलसंपदा विभागाकडे पाठवणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन, ज्या शेतकऱ्यांच्या जागा या धरणासाठी जाणार असतील त्यांना योग्य तो मोबदला देऊन, तांत्रिक बाबी तपासून घेऊन  व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या धरणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

या धरणासाठी आजवर करोडो रुपये खर्च देखील करण्यात आला आहे. हा विषय कल्याण पूर्व व कल्याण ग्रामीण मध्ये राहणाऱ्या भूमीपुत्रांचा पाण्याची टंचाई मिटवून येथील उद्योगांना झळाळी देणारा ठरणार आहे. हा कुणाचाही वैयक्तिक किंवा पक्षाचा मुद्दा नसून सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी याबाबत एकत्र येऊन जोर लावल्यास व पाठपुरावा केल्यास कुशिवली धरणाचा विषय हा नक्की मार्गी लागू शकतो  असा विश्वास निकम यांनी  व्यक्त केला आहे. कुशीवली धरण संदर्भात लवकरच जलसंपदा मंत्री, पालकमंत्री,  खासदार, आमदार व संबंधित सर्वांना प्रत्यक्ष भेटून त्यांना लेखी पत्र देण्यात येणार आहे.

दरम्यान या महत्वाच्या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधावे यासाठी लवकरच प्रत्यक्ष जागेवर एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निकम यांनी सांगितले. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत