शिवजयंती निमित्त शिवकालीन शस्त्र आणि नाणी यांचे प्रदर्शन

Views: 483
शेअर करा:

अचिव्हर्स महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ न्यु कल्याणचा उपक्रम

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अचिव्हर्स महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ न्यु कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पश्चिमेतील अचिव्हर्स महाविद्यालय येथे शिवकालीन शस्त्र आणि नाणी यांचे एकदिवसीय भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते.  यावेळी अचिव्हर्स कॉलेजचे चेअरमन महेश भिवंडीकर, माजी नगरसेवक अरविंद मोरे, प्रतिक पेणकर, भगवान मोरे यांच्यासह कॉलेज मुख्याध्यापिका सोफिया डिसोझा, शाळा मुख्याध्यापक हनुमंत म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते.

अरविंद मोरे यांनी वीर तानाजी मालुसरे ने कशा प्रकारे जिद्दीने कोंढाणा किल्ला सर केला याबाबत सांगितले. कविता करंबेळकर यांनी सूत्रसंचालन केले. तर सिध्दी चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच प्रणय शेलार यांनी सर्व शिवकालीन शस्त्र आणि नाणी बाबत माहिती दिली. तर ओमकार करांगळकर आणि रोहन मोरे यांनी शिवकालीन युद्धकला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या प्रदर्शनाला कल्याण मधील विविध शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट देत शिवकालीन शस्त्र आणि नाण्यांची माहिती घेतली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत