केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कल्याणमध्ये घरोघरी जनसंपर्क अभियानाला सुरवात

Views: 456
शेअर करा:

कल्याण मोदी@९ घरोघरी जनसंपर्क अभियान अंतर्गत भिवंडी लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील कल्याण पश्चिम येथील चिकणघर व गौरीपाडा येथे  केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटिल यांनी या अभियानाची सुरवात केली.

मोदी सरकारला ९ वर्षे झाली त्या अनुषंगाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाजनसंपर्क अभियान संपूर्ण देशांमध्ये सुरू आहे. ३० मे पासून ३० जून पर्यंत हे संपर्क अभियान वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवले जाणार आहे. त्याचा एक टप्पा आज २० तारखेपासून ते ३० तारखेपर्यंत हर घर संपर्क, घर चलो अभियान अशा प्रकारचे अभियान असून त्या अभियानाची सुरुवात कल्याण पश्चिम मधील चिकणघर गावात केली. याठिकाणी अनेक घरांमध्ये जाऊन तिथे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये जी विकासाची कामे झालेली आहेत त्याचा एक पत्रक  प्रत्येक घरोघरी दिलं. त्याचं सरल ॲप डाऊनलोड करून घेतला त्यांच्यासोबत सेल्फी काढली.

मोदींच्या सरकारमध्ये नऊ वर्षांमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून जे देशांमध्ये काम झालेले आहे. फक्त देशातच नाहीत जगाने कौतुक केलं, म्हणून त्यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली. ७२ टक्के लोकांनी पसंती घेऊन आज फक्त देशाचे नाही तर जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता मोदींमध्ये निर्माण झाली. याची सगळी माहिती प्रत्येक घरोघरी व्हावी या हेतूने हे अभियान राबविले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिली.

यावेळी कपिल पाटील यांच्या समवेत माजी आमदार नरेंद्र पवार, शहर प्रमुख प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, अर्जुन म्हात्रे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष ज्योती भोईर, राजाभाऊ पातकर, सुधीर वायले, दीपक दोरलेकर, साधना गायकर, कविता वर्मा आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत