आम आदमी पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात आंदोलन

Views: 611
शेअर करा:

कल्याण : केंद्रातील भाजप सरकारच्या दडपशाही विरोधात डोंबिवलीत पश्चिम महात्मा गांधी उद्यान येथे आम आदमी पार्टीच्या वतीने शांतिपूर्ण आंदलोन करण्यात आले.

दिल्लीतील जनतेला जागतिक दर्जाचे शिक्षण व आरोग्य, मोफत वीज, पाणी व महिलांना प्रवास देण्याचे कार्य करणारे अरविंद केजरवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीचे सरकार आहे.  तर दुसरीकडे अडाणी सारख्या भ्रष्ट उद्योगपतींची पाठराखण करणारे केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. आज देश-विदेशात आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकार ची स्तुती होत आहे. दिल्ली सरकारच्या चांगल्या कामाची तुलना भाजप शासित राज्यांच्या सरकारशी होत आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी विचारलेल्या कठीण प्रश्नांमुळे अडचणीत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय)  आज  अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसल्यामुळे वेळ प्रसंगी अरविंद केजरीवालांना तुरुंगात टाकून भाजप कडून दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार बरखास्त केले जाऊ शकते.

या दमनकारी भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवली तर्फे संविधानिक मार्गाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर शांतिपूर्ण आंदलोन करण्यात आले. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत