Views: 401
कल्याण : सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षला शिवसेना नावासह धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्याने कल्याणात बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी चौकात जल्लोष साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण पश्चिम बाळासाहेबाची शिवसेनचे शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर, सुनील वायले, मोहन उगले, माहिला आघाडी कल्याण जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, आदिनसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी उपस्थित होते.
शिवसेना … मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो… एकच साहेब शिंदे साहेब… आशा घोषणा देत, पेढ़े वाटप करत, फटाके फोडत उपस्थित बाळासाहेबांची शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त केला. तर महिला कार्यकर्त्या पदाधिकार्यानी ढोल ताश्याच्या तालावर ठेका धाराला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज निर्णय दिला शिवसेना नावासह धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. उठाव करून शिंदे गट म्हणून आम्ही बाहेर पडलो, ते बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना वाचवण्यासाठी. ते निवडणूक आयोगाने देखील मान्य केले. लोकशाही असल्यामुळे बहुमताला प्राधान्य आहे. आमच्याकडे खासदार, आमदार, शहर प्रमुख, संपर्क प्रमुख आहेत. या बहुमताच्या जोरावर निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला असल्याचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.



