Views: 516
कल्याण : शहराच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी शहरातील विविध भिंती रंगवण्यात आल्या असून त्याची वेगळी छाप पडत आहे. त्याच अनुषंगाने कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त बंगल्या बाहेरील भिंतींवर ऐतीहासिक किल्ल्यांचे चित्र रेखाटण्यात आले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका परिसर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्ग्दर्शानाखाली सार्वजनिक रस्त्यावरील भिंती, उद्याने, मुख्य रस्त्यांवरील दुभाजके, चौक परिसर आदि रंगवण्यात आले आहे. या सुशोभीकरणामुळे शहर सौन्दर्यकरणात भर पडली आहे. त्यातच हा सुशोभीत परिसर नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.
कल्याण डोंबिवली शहराच्या कायापालट अभियांनांतर्गत शहरातील विविध भिंतींवर, आकर्षक चित्र रंगवण्यासाठी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली शहरात विविध भिंतीवर भिंती चित्रके लोकसहभागातून काढण्याचे काम सुरू आहे. या मधायमातून आयुक्त यांच्या बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवर ऐतीहासिक गडकिल्ल्यांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. हे चित्र जेजे स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी कृती पटेल हिने साकारले आहे. रात्री आंधरत ते पाहता यावे यासाठी दिव्यांची रोषणाई देखील करण्यात आले असल्याचे विद्युत अभियंता प्रशांत भागवत यांनी संगितले.



