कल्याण : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आजूबाजूला अनधिकृत पणे उभ्या करण्यात आलेल्या सुमारे अनाधिकृत ३५ टपऱ्यांच्या सान्निध्यामुळे दलालांचा विळखा पडत असल्याचे चित्र दिसत आहे. अनाधिकृत पणे उभ्या असणाऱ्या या टपर्या कुणाच्या आशिर्वादाने उभ्या आहेत. या बाबत चर्चा विचर्चा असून या अनाधिकृत टपर्या त्यांचे मालक असणाऱ्या आजी माजी नगरसेवकासह विविध राजकीय पक्ष्यांच्या पदाधिकाऱ्यांसह युनियन कार्यकर्ते यांनी या टपऱ्या भाडेतत्त्वावर दिल्या असून विद्युत मंडळाने त्यांना वीज मीटर देऊन वीज पुरवठा दिल्याचे देखील उघड चर्चा उपप्रादेशिक कार्यालयातील कर्मचारी लेखणीबंद आदोलन पार्श्वभूमीनंतर रंगल्या आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका दुतर्फा रस्त्यांवर उभ्या करण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाईबाबत उदासीनतेचे धोरण अवलंबित असल्याने सुरुवातीच्या काळात हातावर मोजल्या जाणाऱ्या टपऱ्यांनी परिवहन कार्यालयाला गिळंकृत करण्यासाठी नव्या टपऱ्या नव्याने उभ्या करीत सुमारे ३५ टपऱ्यांवर ऑनलाइनचा कारभार सुरू केला आहे. परमिट, लायसन्स त्याचे नूतनीकरण करणे आदी विविध कामे टपऱ्या मध्ये बसलेले एजंट करताना दिसून येत असल्याने दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. आज मितीस किमान दोनशेच्या आसपास एजंट कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.
टपरी बनविण्याकरिता सुमारे पंचवीस हजार रुपये खर्च केला जात असून भाडे तत्वांतून दरमहा टपरी मालकाला एका टपरी मागे किमान पाच ते सात हजार रुपये भाडे मिळत आहे. आरटीओच्या कामा व्यतिरिक्त अन्य टपऱ्या मध्ये झेरॉक्स दुकान, जेवणाची खानावळ, पानपट्टी टपरी तसेच वडापाव टपऱ्या या मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या आहेत. यात आजी-माजी व राजकीय कार्यकर्त्यांच्या किमान तीन ते चार टपर्या आपल्या मालकीच्या असल्याने महिना किमान वीस ते पंचवीस हजार रुपयांची वसुली होत असल्याची चर्चा आहे. या अनधिकृत टपऱ्यांना राज्य विद्युत मंडळाने विज मीटर देऊन वीज जोडणी न दिल्याने याबाबत येथे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान राजकीय पदाधिकाऱ्यांनी या अनधिकृत टपऱ्याबाबत कुठलाही मुलहिजा न बाळगता पालिका परिवहन प्रशासकाला फाट्यावर मारत असल्याचे उघड होत असल्याचे बोलले जात आहे.
एका टपरीवर किमान तीन ते चार एजंट काम करीत असून असे किमान दोनशे च्यावर एजंट काम करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राजकीय दबावामुळे किमान ३५ अनधिकृत टपऱ्या पालिकेच्या रडारवर येत नसल्याचे समजते. अनाधिकृत टपऱ्या हटविण्यासाठी कल्याण डोंबिवली प्रशासनाला पत्रव्यवहार केला असल्याचे कल्याण उपप्रादेशिक आधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.
“ब” प्रभाग सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अनाधिकृत टपर्यंबबत नोटीस बजाविल्या असून दुसरी नोटीस दिल्यानंतर अनाधिकृत टपऱ्यावर कारवाई करणार आहोत.” यातील अधिकूत टपऱ्या बाबत मालमत्ता विभागकडे माहिती मिळेल असे किती टपऱ्याअधिकूत याबाबत विचरणा केली असता उत्तर दिले.


