भटके विमुक्त समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपा कटिबद्ध – माजी आमदार नरेंद्र पवार

Views: 407
शेअर करा:

कल्याण : भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक आढावा बैठक नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली. उत्तर महाराष्ट्र विभागात भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या वाढीसाठी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

पक्षाच्या वाढीसाठी भटके विमुक्त समाजाचे संघटन करण्याची आवश्यकता आहे. केवळ राजकीय दृष्टीने नाही तर त्यांच्या अडचणी, समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी आपण सक्रिय राहून काम करण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले. तसेच भटक्या समाजाची भटकंती थांबली पाहिजे यासाठी ठोस कार्यक्रम सरकारने राबविला पाहिजे, भटक्या समाजाची कागदपत्रांची अडचण आहे त्यांना मिळवुन देण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.     

यावेळी भाजपा प्रदेश सचिव लक्ष्मणराव सावजी, भटके विमुक्त आघाडी प्रदेश सहसंयोजक शिवाजी आव्हाड, भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथजी ढगे, भटके विमुक्त आघाडी प्रदेश युवा सहसंयोजक अशोक शेळके, भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक संपतराव नागरे, ग्रामीण जिल्हा संघटन सरचिटणीस सुनिल बच्छाव, नाशिक शहर अध्यक्ष गिरीश पालवे, भ.वि.आ.नाशिक शहर अध्यक्ष बापू शिंदे, प्रदेश कार्यालय प्रमुख राज खैरनार आदी. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत