Views: 593
कल्याण : पुण्याप्रमाणे कल्याण मध्ये देखील ओला उबेरवर चालणाऱ्या रिक्षांवर बंदी घालावी या मुख्य मागणीसाठी भाजपा वाहतूक संघटना पाठपुरावा करत असून या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने १२ मे रोजी उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत आज संघटनेच्या शिष्टमंडळाने कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांची भेट घेऊन १० मे पर्यंत ओला उबेर रिक्षांना बंदी घालण्याची मागणी केली. अन्यथा १२ मे रोजी उपोषण करणारच असा इशारा दिला आहे. यावेळी भाजपा वाहतूक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विल्सन काळपुंड, कार्यकारणी सदस्य विजय मोरे, कल्याण तालुका अध्यक्ष उमेश कठडी, कल्याण शहर अध्यक्ष धनाजी फनाडे, कल्याण पश्चिम अध्यक्ष चंद्रकांत वडतिले, कल्याण आरटीओ सहाय्यक प्रतिनिधी आदेश काळपुंड हे उपस्थित होते
पुणे आरटीओ ने त्यांच्या हद्दीत ओला उबेर सेवा बंद केलेली आहे त्याच पद्धतीने कल्याण आरटीओने कल्याण हददीत देखील ओला उबेर सेवा बंद करावी. वायुवेग पथक म्हणजेच भरारी पथक हे फक्त रिक्षा चालकांची चेकिंग करतात, के.डी.एम.सी. परिवहनच्या बसेस दोन वर्ष पासिंग नाही, केडीएमसी च्या कॉन्ट्रॅक्ट मधील कचरा उचलणाऱ्या कचऱ्याच्या गाडया त्यांच्या पासिंग नाही, एस. टी. महामंडळाच्या बसेसची देखील पासिंग नाही, यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही फक्त रिक्षा चालकांवरच कारवाई करण्यात येते, त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. जे रिक्षा चालक नोकरी करतात, त्यांना ड्रायव्हर मिळत नसल्याकारणाने विदाऊट लायसन्स बॅचधारक यांना रिक्षा देतात. त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी. जर १० तारीखेच्या आत या मागण्या मान्य न झाल्यास 12 मे रोजी उपोषण होणारच असे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विल्सन काळपुंड यांनी सांगितले
याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी सांगितले की ओला उबेर रिक्षावर कारवाई करण्यात येणार असून विदाऊट लायसन्स बॅच रिक्षांवर वर कारवाई होणार, ड्रिंक अँड ड्रायव्हिंग चालकांवर कारवाई होणार, केडीएमसीच्या अजून काही विदाऊट फिटनेस वाल्या बस बाहेर येतात त्यांना नोटीस पाठवणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.



