Views: 698
कल्याण : महाराष्ट्र राज्याच्या वर्धापनदिनानिमित्त अविनाश सोनवणे लिखित “भारतीय संस्कृति” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कल्याण येथील अचिवर्स स्कूल सभागृहात संपन्न झाला.
प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीएमसी शिक्षणाधिकारी विजय सरकटे, तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिक्षक आमदार डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे, बीएमसी शिक्षणाधिकारी आनंदराव सूर्यवंशी, साहित्यिक एकनाथ आव्हाड उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन संपन्न झाला.
लेखक अविनाश सोनवणे यांनी “भारतीय संस्कृती” या पुस्तकांविषयी महती व माहिती विस्तृत सांगितली. रामायण- महाभारत, भगवद्गीता, दर्शनशास्त्र, हस्तशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांविषयी संक्षिप्त माहिती पुस्तकात नमूद केल्याचे सांगितले.



