Views: 492
दिपेश म्हात्रे फाऊंडेशनच्या दहीहंडीतून दिला जाणार सामाजिक संदेश
कल्याण : सामाजिक संदेश देणारी भव्य दहिहंडी डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौकात दिपेश म्हात्रे फाऊंडेशनच्या वतीने साजरी केली जाणार आहे. कर्ण बधीर विद्यार्थ्यांच्या हस्ते हंडी फोडून या दहीहंडी उत्सवाला सुरवात होणार आहे. कोरोनामुळे दहिहंडीचा उत्सव साजरा करता आला नव्हता. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने आत्ता दहिहंडाचा उत्सव साजरा होता आहे. त्यामुळे यंदा उत्सवात मोठा उत्साह असणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी दिली आहे.
डोंबिवलीतील संवाद कर्ण बधीर शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते हंडी फोडून उत्सवाची सुरुवात करणार आहे. या हंडीचे स्वरुप लहान असेल. ही हंडी कमी उंचीवरील असेल त्यातून सामाजिक संदेश दिला जाणार आहे. तर एक हंडी डोंबिवलीतील, दुसरी मुंबईतीली गोविंद पथकांकरीता बांधली जाईल. तिसरी हंडी महिला गोविंद पथकाकरीता बांधली जाणार आहे. कल्याण डोंबिवलीसह मुंबईतून जवळपास १०० पेक्षा जास्त गोविंद पथके हंडी फोडण्यासाठी याठिकाणी येणार आहेत.
सगळ्य़ात वरच्या थरावर चढणाऱ्या दोन गोविंदाना सेफ्टी बेल्ट दिला जाणार आहे. जिवित सुरक्षिततेची सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे. कोणालाही इजा न पोहचणार नाही अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जाणार आहे. सहभागी होणाऱ्या गोविंदाचा सत्कार केला जाईल. तसेच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शहराच्या पश्चिम भागातील सम्राट चौकात हंडी उभारली जाणार आहे. हा रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवला जाईल. अन्य पर्यायी रस्त्याने वाहतूक केली जाईल. वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी फाऊंडेशनच्या वतीने वाहतूक पोलिसांच्या मदतीला ३० वाहतूक वॉर्डन पूरविले जाणार असल्याची माहिती दिपेश म्हात्रे यांनी दिली.



