Views: 453
कल्याण : संत निरंकारी मिशनच्या वतीने डोंबिवली झोन अंतर्गत कल्याण ब्रांच तर्फे रविवारी संत निरंकारी सत्संग भवन कोनगाव येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १२२ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्यामध्ये १०५ पुरुष तर १७ महिला रक्तदात्यांचा समावेश होता. जे. जे. महानगर रक्तपेढी मुंबई आणि संत निरंकारी रक्तपेढी विलेपार्ले यांनी रक्त संकलन केले.
संत निरंकारी मंडळाच्या डोंबिवली झोनचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्याहस्ते दीप प्रज्वलीत करून, नामस्मरण करत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कल्याणसह आजूबाजूच्या कोनगाव, सरवली, गोवा नाका, रांजनोली, पिंपळास, पिंपळनेर, कचोरे, नेतीवली, पिसवली, नेताजी नगर, रामनगरी, तिसगाव, माणेरे आदी परिसरातील निरंकारी भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने या शिबिरात भाग घेतला. कल्याण ब्रांचचे मुखी जगन्नाथ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल सदस्यांनी शिबिराच्या आयोजनामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.



