उद्धव सेनेच्या मराठवाडा मधील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Views: 439
शेअर करा:

मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पारदर्शी कामामुळे झालो प्रभावित : अशोक राठोड

कल्याण सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पारदर्शी कामामुळे आम्ही प्रभावित झालो असल्याचे नाना राठोड यांनी सांगत उद्धव सेनेच्या मराठवाडा मधील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी  डोंबिवलीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कामावरती विश्वास ठेवून हा प्रवेश केला असून आम्हाला त्यांच्या पारदर्शक कामाबद्दल प्रचंड आदर आहे. आम्ही त्यांचे काम पाहिले आहे. महाराष्ट्राला अशा नेत्याची गरज असून त्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. आम्हीही आता मराठवाडयामध्ये सिल्लोड, नांदेड, उस्मानाबाद आदी सर्व भागात पक्ष वाढी, बळकटीसाठी झटणार असल्याचे राजपूत समाजाचे मराठवाडा येथील नेते माधव सिंह राजपूत उर्फ, अशोक राठोड यांनी डोंबिवलीत व्यक्त केले.  

बदनापूर विधानसभेचे भाजपचे आमदार नारायण कुचे, कल्याण जिल्हा सरचिटणीस कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर (नंदू) परब, दत्ता माळेकर यांच्या उपस्थितीत राजपूत समाजाच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. शुक्रवारी  त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम डोंबिवली पूर्वेकडील ठाकूर हॉल सभागृहात संपन्न झाला. त्यामध्ये प्रामुख्याने  अनिल राठोड, रामेश्वर काळे, योगेश ठोंबरे, समाधान वाघ, लहू तिडके आदी कार्यकर्त्यांचा समवेश होता.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत