कल्याण रेल्वे स्थानकाच्या विविध समस्यांवर शिवसेना आक्रमक

Views: 538
शेअर करा:

कल्याण कल्याण रेलवे स्थानकात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गैरसोयी बाबत शिवसेना (उबाठा) चे  विधानसभा सहसंघटक रूपेश भोईर यांनी रेल्वेला लवकरात लवकर समस्या सोडविण्याचे निवेदन दिले.  

रूपेश भोईर यांनी कल्याण रेलवे स्थानकाची पाहणी केली आणि स्थानकातील गैरसोयी बद्दल प्रत्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांना  हकीकत सांगीतली. याचसोबत कल्याण स्थानक आणि स्थानका बाहेर नियोजनाअभावी जनतेची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इन्दुराणी जाखड यांच्यासह पोलीस उपायुक्त, शहर वाहतुक नियंत्रण उप शाखाचे सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक यांना पत्र पाठवून एक आढावा बैठक घेण्याची विनंती केली.

त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना (उबाठा) शहर शाखेतर्फे रूपेश भोईर यांनी एकूण बारा मुद्दे समोर ठेवले आहेत. त्यात मुख्य म्हणजे रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा तळ बनविणे, रेल्वे परिसरात अनधिकृत वाहनांना प्रवेश बंदी, मेल एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्म वर शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, फलाट क्रमांक चार आणि पाच वर प्रतिक्षालय बनविने, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने सर्व फलाटावर शौचालय निर्माण करणे. तसेच तिकिट आरक्षण केन्द्रा जवळ लघुशंकेसाठी आणि अन्य सोय करणं. रेल्वे विभागा तर्फे रूपेश भोईर यांना लेखी पत्र देऊन सर्व मुद्दयावर योग्य उपाय योजना करण्याची हमी दिली आहे. यावेळी भोईर यांच्यासोबत विविध प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत