Views: 410
एकाच ठिकाणी मिळणार २४ हून अधिक प्रकारच्या पुरणपोळ्या
कल्याण : अप्रतिम चवीच्या पुरणपोळ्यांसाठी प्रसिद्ध भास्कर पुरणपोळी घर ने आज कल्याण शहरातील रहिवाशांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. ठाणे आणि कांदिवलीमधील ग्राहकांच्या मोठ्या प्रतिसादानंतर हा ब्रँड कल्याणकरांच्या देखील नक्कीच पसंतीत उतरेल. कल्याण येथील या आऊटलेटचा शुभारंभ अभिनेत्री संपदा वझे यांच्या हस्ते आणि हिमांशू तोमर, विठ्ठल शेट्टी, तसेच इतर मान्यवर, पाहुणे आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
भास्कर पुरणपोळी घर हे बीपीजी युनिकॉर्न एलएलपीच्या मालकीचे आहे. ज्यांना फूड, ऑपरेशन्स आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीजमध्ये २० ते २५ वर्षांचा अनुभव आहे. २०२१ मध्ये ठाण्यातील पहिल्या आउटलेटसह सुरू झालेल्या, ३ लाखांहून अधिक ग्राहकांनी २४ हून अधिक पुरणपोळीच्या प्रकारांचा आस्वाद घेतला आहे. २४ हून अधिक प्रकारच्या अस्सल पुरणपोळ्या ज्या फ्रेश व नैसर्गिक पद्धतीने तयार केल्या जातात, यात कोणतेही केमीकल आणि प्रिझरवेटिव्ह किंवा पल्प वापरला जात नही. या पुरणपोळ्या १०० टक्के नॅचरल आणि फ्रेश असतात.
यावेळी बोलताना कल्याण आउटलेटचे फ्रँचायझी मालक हिमांशू तोमर म्हणाले, “पुरणपोळी ही महाराष्ट्रीयन गोडातील मुख्य पर्दार्थांपैकी एक आहे आणि मला या ग्रुपशी जोडले गेल्याबद्दल आणिकल्याण शहरातील रहिवाशांसाठी आउटलेट उघडताना खूप आनंद होत आहे. आजच्या आधुनिक जगात महाराष्ट्राची मूळ संस्कृती परत आणणे ही आमची मूळ संकल्पना आहे. आमच्या आउटलेटमध्ये आम्ही ताजी पुरणपोळी तयार करतो जी आमच्या स्टोअरमध्ये खाता येईल किंवा घरी देखील नेता येईल. पुरणपोळी सोबतच आमच्याकडे मसाल्याचे पदार्थ, मिठाई, मसाले आणि लोणची आणि अतिशय प्रसिद्ध असे उकडीचे मोदक हे अतिरिक्त प्रकार देखील आहेत.
यावेळी बोलताना अभिनेत्री संपदा वझे म्हणाल्या, कल्याणमध्ये पुरणपोळी घर या आउटलेटचे उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे. मी स्वत: एक महाराष्ट्रीयन मुलगी असल्यामुळे मी विविध प्रसंगी आणि सणांमध्ये पुरणपोळी खातच मोठी झाले आहे. पुरणपोळी ही माझ्या आवडत्या महाराष्ट्रीयन गोड पर्दार्थांपैकी एक आहे.



