सव्वा नऊ कोटी रुपयांच्या निधीतून रस्ताच्या दुरुस्तीच्या कामाला शुभारंभ

Views: 630
शेअर करा:

बल्याणी टिटवाळा खड्डेमय रस्त्याचे अखेर ग्रहण सुटले असून खड्डेमय रस्त्यामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांना मिळणार दिलासा  

कल्याण  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील  “अ” प्रभाग क्षेत्रातील आंबिवली नजीक असलेल्या बल्याणी मार्गे टिटवाळाला  जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून जागो जागी पडलेल्या खड्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वाहतुक कोंडी होत आहे. यामुळे वाहनांच्या अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने रस्त्याच्य दुरुस्तीसाठी स्थानिक माजी नगरसेवक मयूर पाटील व नमिता पाटील यांनी गेली वर्षभर पालिका प्रशासनाकडे  पाठपुरावा केल्याने अखेर पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले असून खड्डेमय रस्त्याला लागलेले ग्रहण सुटले आहे. तब्बल सव्वा नऊ कोटी रुपयांच्या निधीतून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते कामाला सुरुवात केल्याने येत्या महिन्याभरात खड्डेमय रस्त्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.

    कल्याणहुन आंबिवली मागे टिटवाळा शहराला जोडणारा बल्याणी प्रभागातील मुख्य रस्त्याची चाळण झाली असून जागो जागी खड्डे पडले असल्याने या खड्डेमय रस्त्यातून कल्याणहुन टिटवाळा व टिटवाळाहुन कल्याण शहराकडे येजा करावी लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नगरसेविका नमिता मयूर पाटील यांनी  पालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून वेळो वेळी लक्ष वेधले असतानाही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने खड्डेमय रस्त्यातून वाहन चालकांना आपली वाहने चालविण्याची तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

बल्याणी व आजू बाजूच्या परिसरात गेल्या काही वर्षा पासून मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येत वाढ झाल्याने पर्यायाने वाहनांची ही संख्या वाढत आहे. वाहनांच्या वर्दळीत वाढ होत असल्याने त्यामानाने रस्त्याची रुंदी कमी असल्याने पालिका प्रशासनाने त्वरित या महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्त्याचीच दुरुस्ती करावी याबाबत माजी नगरसेवक मयुर पाटील व नमिता पाटील यांनी पालिकेच्या शहर अभियंता यांच्याकडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध कडून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता.

अखेरीस पाटील दाम्पत्याच्या  पाठपुराव्याला यश आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते दुर्गामाता मंदीरार्पयत रस्ते विकास कामाला सुरुवात होणार आहे. या रस्ते विकास कामाकरीता महापालिकेकडून ९ कोटी२४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते या रस्ते विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. भाजपकडून या रस्त्यासाठी काही दिवसापूर्वीच आंदोलन करण्यात आले होते. या प्रसंगी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले की, विरोधकांना माहिती होते की या रस्त्याचे मंजूर झाले आहे. त्याच्या शुभारंभही करण्यात येणार आहे. तरी देखील त्यांनी आंदोलन करून स्टंट बाजी केल्याचे सांगितले. एखादे काम पालिकेकडून मंजूर करण्यासाठी काय प्रक्रिया पार पाडावी लागते हे विरोधकांना माहिती नसल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत