केडीएमसीच्या मराठी माध्यमिक शाळा नेतिवलीचे घवघवीत यश

Views: 421
शेअर करा:

कल्याण कल्याण डोंबिवली मनपाची मराठी माध्यमाची शाळा तत्कालिन आयुक्त विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नेतीवली येथे सुरु करण्यात आली. पहील्या वर्षीच शाळेचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल ८६% लागला असून ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झालेले आहेत.

कोव्हीड -१९ नंतर २ वर्षांनी शाळा उघडल्यावर ९ वी मध्ये प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी समुपदेशन करून पुढील शिक्षणासाठी प्रेरीत केले. विशेषतः कोरोनात गोर गरीबांची ८ मुले मुली असे होते की त्यांचे आई वडील मयत झाली. आपल्या लहान भावांना सोबत घेऊन शेजार्‍यांकडे तसेच आत्या मावशीकडे राहून शिक्षण घेण्यासाठी टिकुन होती.  अशा मुलांना २ वर्षानंतर शाळा उघडल्यावर ९वी मध्ये व्यवस्थित मार्गदर्शन केल्याने मुलं १० वीत प्रवेशीत करता आली.  अशी मुलं इ १०वी उत्तीर्ण होताना पाहिल्यावर शिक्षकांना स्वतःची मुलं पास होणाऱ्या आनंदापेक्षा खुप मोठा झाला आहे अशी भावना मुख्याध्यापक रविंद्र माळगावी व त्यांच्या ५ सहकारी शिक्षक प्रविण कांबळे, दिलीप चेडे, कोमल माळी, योजना बारी व संतोष पाटील यांनी व्यक्त केली.

या शाळेस प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांनी सेवाभावी संस्थांकडून वह्या पुस्तके, स्कुल बॅग, बुट मोफत उपलब्ध करून दिले.  तसेच मुलांसाठी ४८ हजार  किंमतीचे वॉटर फिल्टर सेवाभावी संस्थेकडून उपलब्ध करून दिले. शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक यांना उपायुक्त धैर्यशिल जाधव यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने शाळेला पहील्या वर्षी घवघवीत यश मिळाले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत