श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी कॉ. डॉ कविता वरे यांची निवड

Views: 463
शेअर करा:

कल्याण २५-२७ जून २०२४ दरम्यान कोलंबो, श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील किसळ गावच्या सरपंच कॉ. डॉ. कविता वरे यांची अभिनंदनीय निवड झाली आहे. “महिलांच्या प्रतिनिधित्वाद्वारे सामाजिक प्रतिरोध मजबूत करणे” हा या बैठकीचा विषय आहे. युरोपियन युनियन आणि कॅनडा सरकारने पुरस्कृत केलेल्या या बैठकीत जगातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे दीडशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

इतक्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी कॉ. कविता वरे यांची झालेली निवड ही त्या लोक प्रतिनिधी म्हणून करत असलेल्या कार्याची पावती आहे. या बैठकीस उपस्थित राहून लोकशाही राजकीय प्रक्रिया मजबूत करण्याचे विविध आयाम समजून घेण्याची संधी त्यांना प्राप्त होत आहे. कॉ. डॉ. कविता वरे यांच्या या विशेष निवडीबद्दल मुरबाड तालुक्यातील जनतेस समाधान आणि अभिमान वाटत असून समस्त मुरबाडकर जनता त्यांचे हार्दिक अभिनंदन करत आहे आणि बैठकीतील भरीव सहभागासाठी शुभेच्छा देत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत