Views: 567
कल्याण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालयात ‘नेचर क्लब’ मार्फत “प्लास्टिक फ्री कॅम्पस अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाला प्लास्टिकचा असलेला धोका ओळखून महाविद्यालयात प्लास्टिकबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर अभियानाचे आयोजन केले गेले.
या अभियानात महाविद्यालयाच्या प्रांगणातील प्लास्टिक उचलून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. सुमारे तासभर चाललेल्या या अभियानातून एकेरी वापरात असलेले प्लास्टिक गोळा करण्यात आले. या उपक्रमात पदवी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते. नेचर क्लबच्या सदस्या प्रा. सुनंदा शिंदे, डॉ. चिंतामण भोईर, प्रा. सविता पाटील, प्रा. संगीता सोमय्या, प्रा. के डी शिंदे, विनय भिसे, रवी खिलारे, सुरेश शेलार व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. प्राचार्य डॉ. अरुण देवरे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.



