वयाच्या ५१ व्या वर्षी छाया यांचे १० वी च्या परीक्षेत घवघवीत यश

Views: 592
शेअर करा:

कल्याण डोंबिवलीत राहणाऱ्या छाया वाघमारे यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी १० वीच्या परीक्षेत ६६.२० टक्के गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले आहे. आपल्या कुटूंबाचा गाढा ओढत छाया यांनी जिद्दीने १० वी पास होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

कमी वयात लग्न झाले असल्याने त्यांना १० वी पास होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. परंतु तब्बल ३५ वर्षानंतर छाया यांनी पुन्हा मुबंई येथील व्ही.एस.एम. भायखळा नाईट हायस्कूल येथे ऍडमिशन घेत. जिद्दीने दिवस रात्र अभ्यास केला. कोणतेही खाजगी क्लासेस न लावता शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम नियमिय करत १० वीच्या परीक्षेत ६६.२० टक्के गुण मिळवले आहेत.

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा मला खूप आनंद आहे. तसेच शाळेतील मुख्यधापक आनंद पाटील, त्याचसोबत सुरेश काळे, कदम, गटरी, मासुम ट्रस्टचे खर्डे, कविता गीते या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळेच मला १० वीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होता आले असल्याचे छाया यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. दरम्यान मागच्या वर्षी छाया यांनी नर्सिंगची परीक्षा देत त्या उत्तीर्ण झाल्या.  यापुढेही अजून शिकायची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. छाया यांना १ मुलगा आणि १ मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत