कोकणची लोककला परदेशात सादर होणार

Views: 259
शेअर करा:

कल्याण : कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने मुंबई–ठाणे परिसरात वास्तव्य करणाऱ्या काही तरुण शिवभक्त कलाकारांनी सहा वर्षांपूर्वी ‘शिवभक्त कोकण नमन’ या लोककलेची सुरुवात केली. गेल्या सहा वर्षांत अनेक ठिकाणी यशस्वी सादरीकरणे करत रसिकांची मने जिंकणारे हे नमन आता प्रथमच परदेशात सादर होणार असून ही कोकणच्या लोककलेसाठी अभिमानास्पद बाब आहे.

या उपक्रमाचे दिग्दर्शक निलेश किंजळकर  असून त्यांच्या नेतृत्वाखालील सर्व कलाकारांचे योगदान कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे या नमनामध्ये पारंपरिक रितीनुसार सर्व पात्रे पुरुष कलाकारांकडूनच साकारली जातात. या लोककलेच्या माध्यमातून कोकणातील विविध सामाजिक समस्या, जीवनशैली आणि संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडवण्यात येते. या नमनाला मार्गदर्शन करणारे कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था अध्यक्ष सुनील उतेकर, रेखा अत्तरदे, यशवंत परब, राजू कांबळे, गणेश कांबळे, दिपाली आमडोस्कर आणि संजय गावडे यांनी कलाकारांचे मनोबल वाढवत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत