खडकपाडा पोलिसांचे “सायबर क्राईम जनजागृती अभियान”

Views: 409
शेअर करा:

सायबर तज्ञ धर्मेंद्र नलावडे यांनी “ऑनलाइन होणारी फसवणूक” याबाबत केले मार्गदर्शन

कल्याण : कल्याण मध्ये खडकपाडा पोलिसांनी सायबर क्राईम जनजागृती अभियान राबविले असून सायबर तज्ञ धर्मेंद्र नलावडे यांनी ऑनलाइन होणारी फसवणूक याबाबत मार्गदर्शन केले.

खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाळा, कॉलेजचे मुख्याध्यापक यांची बैठक खडकपाडा पोलीस स्टेशन येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थीत शाळा कॉलेजचे मुख्याध्यापक यांना सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार तसेच सायबर तज्ञ धर्मेंद्र नलावडे यांनी ऑनलाइन होणारी फसवणूक याबाबत मार्गदर्शन केले.

फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून उपस्थित मुख्याध्यापक यांना सायबर क्राईम जनजागृती या विषयांकित छापील सूचना पत्रके वाटप करण्यात आली. या सायबर जनजागृती बाबत मुख्याध्यापक ते शिक्षक व शिक्षक ते विदयार्थी आणि विद्यार्थी ते इतर ५ नागरिक असा प्रसार करण्यासाठी मुख्याध्यापक यांनी सहकार्य करावे असे मत उमेश माने पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्यावेळी शाळा, महाविद्यालयाचे ३०ते ३५ मुख्याध्यापक, प्राचार्य उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत