Views: 526
कल्याण : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या मुंबई विद्यापीठ स्तरीय ‘शरीर सौष्ठव’ स्पर्धांचे आयोजन नुकतेच ठाणे झोन क्रीडा समितीच्या सहकार्याने एसएसटी महाविद्यालयातर्फे करण्यात आले. या स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागांमधून विजयी स्पर्धकांनी सहभाग घेतला. यातून यंदाचा ‘मुंबई विद्यापीठ श्री’ चा किताब भांडुप येथील श्रीराम कॉलेजच्या विद्यार्थी अमेय नेउगे याने पटकावून आंतर विद्यापीठीय स्पर्धांसाठी आपले स्थान निश्चित केले.
या स्पर्धांना प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ मोहन आमृले, उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, क्रीडा अधिकारी बाळू नेटके उपस्थित होते. स्पर्धांच्या आयोजनासाठी एसएसटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पुरस्वानी यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य आणि एनएसएसचे ठाणे जिल्हा समन्वयक जीवन विचारे, एसएसटी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक राहुल अकुल, प्रा. तुषार वाकसे, प्रा. मयूर माथुर, प्रा. अनिल तेलिंगे आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासाठी मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ मोहन आमृले यांनी एसएसटी महाविद्यालयाचे कौतुक करत विशेष आभार व्यक्त केले.



