जीवनदीप महाविद्यालयात रांगोळी विक्रीतून सामाजिक सहकार्य उपक्रम

Views: 675
शेअर करा:

कल्याण : जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे  हे नेमीच प्रयत्नशील असतात व यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.  तसेच  महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा आपल्या नाविन्यपूर्ण  उपक्रमाने सर्वांनाच सुपरिचित आहे. यामुळेच आतापर्यंत या विभागाला विद्यापीठ स्तरावरती अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

  याचाच एक भाग म्हणून या विभागातर्फे ‘रांगोळी विक्रीतून सामाजिक सहकार्य’ या उपक्रमाची सुरुवात सोमवार  पासून करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक १७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत महाविद्यालयात रांगोळी विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून अनाथ व वृद्धाश्रमांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. के बी कोरे, संचालक प्रशांत घोडविंदे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश धनगर प्रा. चैताली कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले तर प्राध्यापक, कर्मचारी, स्वयंसेवक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

Happy
Happy
50 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
40 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
10 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत