देशभरात १५४ ठिकाणी ९ भाषांत होणार ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’

Views: 520
शेअर करा:

कल्याण : सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठाणे, डोंबिवली, अंबरनाथला ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ तर देशभरात १५४ ठिकाणी ९ भाषांत ऑनलाईन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’त सहभागी होण्याचे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

  हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरु – शिष्य परंपरा’ राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्कार्य गुरु-शिष्यांनी केल्याचा गौरवशाली इतिहास भारताला लाभला आहे. त्या त्या काळी अधर्म माजला असतांना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडून, आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या आणि शिवछत्रपतींनी संत तुकाराम महाराज अन् समर्थ रामदासस्वामी यांच्या कृपेने आदर्श असे धर्माधिष्ठित राज्य स्थापन केले. आजही राष्ट्र आणि धर्म यांची दुःस्थिती झाली आहे, यावर एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे हा होय. हिंदु राष्ट्र अर्थात धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, ही काळानुसार सर्वोत्तम गुरुसेवाच आहे.

हा संदेश देण्यासाठी ‘सनातन संस्थे’च्या वतीने यंदा १३ जुलै या दिवशी मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात १५४ ठिकाणी प्रत्यक्ष, तर ९ भाषांमध्ये ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात  दोस्ती विहार क्लब हाऊस, दोस्ती विहार, वर्तक नगर, ठाणे (प.), स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे सभागृह, कोरम मॉलच्या बाजूला, क्रिटी केअर हॉस्पिटलच्या जवळ, ठाणे (प.), शुभमंगल सभागृह, एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर, २ रा मजला, डोंबिवली रेल्वेस्थानकाजवळ डोंबिवली (पू.), श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, वडवली दत्त मंदिराजवळ, वडवली विभाग, अंबरनाथ (पू.) या ठिकाणी सायं ६ वाजता गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहून या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

    यांसह 9 भाषांतील ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ सनातन संस्थेच्या ‘यू-ट्यूब चॅनल्स’वरून प्रसारित करण्यात येणार आहेत. मराठी भाषेतील गुरुपौर्णिमा महोत्सव सायंकाळी 7.00 वाजता www.sanatan.org/mr/आणि youtube.com/SSMarathi या लिंकवर ऑनलाईन पाहता येईल. गुरुपरंपरेचे महत्त्व समाजमनावर बिंबावे, समाज साधनेला प्रवृत्त व्हावा, तसेच धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती व्हावी, यांसाठी या गुरुपौर्णिमा महोत्सवांत सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत