Views: 760
कल्याण : ३५० व्या शिवराज्याभिषेक दिना निमित्त नूतन विद्यालयाच्या वतीने सकाळी छत्रपती शिवाजी महाराज, गागा भट्ट, माँ जिजाऊ रथात बसुन लैझिम व ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा रामबाग ते कर्णिक रोड निघाली. या शोभायात्रेचे शाळेत आगमन होताच शाळेच्या मुख्याध्यापिका सय्यद व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती वेदपाठक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे औक्षण केले.
वाजत गाजत जयघोषात शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत विनोद साखरे, जिजाऊच्या वेशभूषेत कांचन माळी आणि कलाशिक्षक श्रीहरी पवळे हे गागा भट्ट यांच्या वेशभूषेत आगमन झाले. प्रमुख अतिथी माजी मुख्याध्यापक श्रीधर केळकर व प्रमुख वक्ते शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पाहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली. त्यानंतर दहावीच्या मुलींनी नृत्य सादरीकरण केले. प्रमुख वक्ते कवाद यांनी श्रीमंत योगी सिंहासनाधीश्वर या विषयावर व्याख्यान केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कल्याणमधील प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित राहुन कार्यक्रमाचे भरभरुन कौतुक केले. शालेय समिती सस्य अविनाश नेवे हे ही आवजृन उपस्यित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभांगी भोसले आभार प्राजक्ता सोनवणे यांनी केले.



