सम्राट अशोक शाळेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

Views: 544
शेअर करा:

कल्याण : पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयाचा सलग चौदाव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा टिकवून ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जाते. अभ्यासात अप्रगत विद्यार्थ्यांना शिक्षक दत्तक घेऊन शाळेच्या व्यतिरिक्त जास्तीचा वेळ देऊन विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेत असतात म्हणून विद्यार्थ्यांना सहज यश संपादन करता येते.

  याही वर्षी मुलींनीच बाजी मारली असून शाळेतून साक्षी सानप ९२.६० टक्के मिळवत प्रथम, देविदास परदेशी ९१.२० टक्के मिळवत द्वितीय आणि  उदाराम राठोड ९१.०० टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.  एसएससी बोर्डाने परीक्षेचे वेळापत्रक तीन महिने आधी डिसेंबर २२ ला ऑनलाइन जाहीर केले व एक दिवसा आड पेपर घेतल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळाला म्हणूनच परीक्षेचा ताण कमी झाला. यामुळे विद्यार्थ्यांना सहज यश मिळवता आले असे शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले.

संस्था अध्यक्ष पी.टी. धनविजय, शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी गणेश पाटील, ओमप्रकाश धनविजय, संगीता महाजन, नयना वाबळे, शोभा देशमुख, माधुरी काळे व उर्मिला साबळे या शिक्षकांचे विशेष कौतुक करून विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत