पहिली रिजेन्सी ट्रॉफी स्केटिंग स्पर्धा संपन्न

Views: 544
शेअर करा:

कल्याण : स्केटिंग असोसिएशन कल्याण तालुका आणि रिजेन्सी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली रिजेन्सी ट्रॉफी स्पर्धा डोंबिवलीच्या अनांतम रेसिडेन्सी येते संपन्न झाली. या स्पर्धेत ठाणे, मुंबई पालघर रायगड येथील १८२ खेळाडू सहभागी होऊन स्पर्धाला चांगला प्रतिसाद दिला. ही स्पर्धा स्केटिंग च्या पाच विविध प्रकारांमध्ये खेळवण्यात आली.

  या स्पर्धेत मुंबईच्या टीम एक्स्ट्रीम या क्लबने विजेतेपद तर मीरा-भाईंदर चा स्केट लाइफ क्लबने उपविजेतेपद पटकावले तर एम. के क्लबला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील विजेत्या संघाला रीजन्सी ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेच्या अतिम पारितोषिक वितरण समारंभ साठी रिजेन्सी ग्रुपचे डायरेक्टर राहुल भाटिचा यांच्या हस्ते करण्यात आले.  तर या स्पर्धेसाठी रीजन्सी ग्रुपचे डायरेक्ट विकी रूपचंदानी यांचे सहकार्य लाभले.

       या स्पर्धेत कियांश अग्रवाल, तक्षी परदेशी, सात्विक मोरया, काशवी जोशी, रिनेश गुप्ता, केरा जगदाळे,  निव्ह कृष्णन, अनिरुद्ध बागरी, मिहिका दास, दिवा मल्होत्रा, रुद्र पवार, संस्कृत यमगर आदी खेळाडू विजयी झाले. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत