बैल बाजार परिसरात रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

Views: 383
शेअर करा:

कल्याण : कल्याण स्टेशन लगतच्या प्रभाग क्रमांक ३६ बैल बाजार परिसरात प्रमुख रस्त्यावरील दुतर्फा मनमानी पद्धतीने होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत असून योग्य वाहतूक नियमन करून कारवाई करण्याची मागणी युवासेनेने केली आहे. याबाबत युवासेना विधानसभा समन्वयक प्रतिक पेणकर यांनी वाहतूक पोलिसांना पत्र दिले आहे.   

बैलबाजार प्रभागातील रहिवासी सोसायटी नागरिकांच्या लेखी तक्रारी माजी नगरसेवक दिवंगत प्रकाश  पेणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्राप्त झालेल्या आहेत. प्रभागातील प्रमुख रस्ते रेल्वे स्टेशन लगतच आहे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत सॅटिस चे काम सुरू झाले आहे. त्यामुळे नियोजनाअभावी नित्य रोज वाहतूक कोंडी व खोळंबा सुरू आहे. सॅटिस चे काम सुरू झाल्यापासून भर रस्त्यावर दुतर्फा सर्व प्रकारचे टेम्पो रिक्षा मोटरसायकल वाहन चालक मनमानी पार्किंग करीत आहेत. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन रहिवासी सोसायटीतल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

या वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन अडचणीत आल्याने नागरिक त्रस्त आहेत. तसेच प्रभागात २ हॉस्पिटल आहेत त्यांना सुद्धा अॅम्बुलन्स येण्यास प्रचंड अडचण होते. कै. ज्येष्ठलाल देरासरी मार्ग उपरोक्त ३० मीटर रुंद रस्ता स्टेशनकडून बाहेर जाण्याकरीता मुख्य रस्ता वलिपीर रोड, बैल बाजार सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्याला समांतर पर्यायी रस्ता आहे. परंतु भर रस्त्यात दुतर्फा कार टेम्पो रिक्षा पार्कीगमुळे या रस्त्याला बेवारस स्वरूप प्राप्त झाले आहे. या रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग हटवल्यास हा रस्ता वाहतुकीस खुला होउन परिसरातील वाहतुक कोंडी कमी होईल. त्यामुळे या वाहनांवर कारवाई करून बेकायदेशीर पाकींग प्रतिबंध करून हा रस्ता वाहतुकीस खुला करण्याची मागणी युवा सेनेचे विधानसभा समन्वयक प्रतीक पेणकर यांनी केली वाहतूक पोलिसांकडे केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत