महापरिनिर्वाण दिनी केडीएमसीचे बाबासाहेबांना अभिवादन

Views: 720
शेअर करा:

कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उदयानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

त्याचप्रमाणे   महापालिका मुख्यालयातही  महापालिका आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी  यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या समयी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, सहा. संचालक,  नगररचना दिक्षा सांवत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेविका सारिका जाधव, उप आयुक्त विनय कुलकर्णी, विभागप्रमुख, जनसंपर्क संजय जाधव, सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे, उप सचिव किशोर शेळके,  सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे आणि इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यासमयी  मोठया संख्येने उपस्थित होते.

डोंबिवली विभागीय कार्यालयातही विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत यांनी डोंबिवली विभागीय कार्यालयालगतच्या पुर्णाकृती पुतळयास तसेच कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यासमयसी  सहा आयुक्त भरत पाटील, सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत