Views: 370
जय गौलोबा युवा मंडळाचे केडीएमसी आयुक्तांना निवेदन
कल्याण : कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून हा रस्ता दुरुस्ती करणे, पडलेले खड्डे बुजवने व रखडून राहिलेले रस्ता रुंदीकरणाचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी जय गौलोबा युवा मंडळ द्वारलीच्या वतीने पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
चक्की नाका ते नेवाळी रस्त्यामधील द्वारली गावाजवळील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा त्रास नाहक गावकर्यांना व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यांच्या खराबीमुळे छोटे मोठे अपघात ही होतात. याआधीही गावातील रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे मोठे अपघात ही झालेले आहेत त्यामुळे तीन निष्पाप व्यक्तींना जीव ही गमवावा लागला आहे.
यामुळे आणखी असे अपघात घडण्यापूर्वी रस्ते सुधारावेत व रस्त्याचे अडून राहिलेले अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी जय गौलोबा युवा मंडळाच्या वतीने प्रशांत पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.



