ओएलएक्सवर चोरीच्या गाड्या विकणाऱ्या दुकलीला अटक

Views: 540
शेअर करा:

कल्याण : चोरीच्या गाड्या ओएलएक्सवर विकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अकबर अब्दुल अजीज शेख व जुनेद अब्दुल अजीज शेख अशी या दोन चोरट्यांची नावं असून, दोघे सख्खे भाऊ आहेत. यांच्याकडून ११ दुचाकी जप्त करण्यात आली आहे. 

     मोह्म्मद आणि जुनेद हे दोघेही ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या OLX या साईटवर विक्रीसाठी अपलोड केलेल्या दुचाकी सारखीच दुचाकी चोरी करायचे. विक्रीसाठी अपलोड केलेल्या दुचाकीची ऑनलाईन गाडी खरेदी करण्यासाठी चौकशी करत आणि संबंधित मालकाकडून गाडीचे कागदपत्र मागून घेत. या कागदपत्रावरून चोरीच्या गाडीचे कागदपत्र तयार करायचे. त्यानंतर चोरीची गाडी OLX वर विकायचे. या दोघांविरोधात याआधी देखील वाहन चोरीचे १४ गुन्हे दाखल आहेत. या १४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, ११ वाहनं जप्त केली आहेत. यामध्ये २ बुलेट, १ अव्हेंजर, १ युनिकोर्ण, १ डीओ, ५ पल्सर आदी दुचाकी गाड्या आणि १ रिक्षा यांचा समावेश आहे. त्यांनी अशा प्रकारे आणखी काही गाड्या विकल्या असाव्यात असा संशय पोलिसांना आहे.

     कल्याण पश्चिम येथील बैल बाजार या परिसरात एक इसम चोरीची बुलेट दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याणचा महात्मा फुले पोलिसांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपी अकबर शेख याला शिताफीने अटक केली. या गुन्ह्यात अकबर याने  ताब्यात घेतलेली बुलेट चोरीची असल्याचे आणि बुलेटची OLX वर बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणार असल्याची माहिती पोलिसाना दिली. या गुन्ह्यात त्याला मदत करणारा त्याचा भाऊ अब्दुल अजीज शेख याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. 

      पोलिसांनी या दोघांकडून कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, शीळ डायघर, मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १४ गुन्ह्यांची उकल करत चोरी केलेली ११ वाहने जप्त केली आहेत. यात २ बुलेट, १ अव्हेंजर, १ युनिकोर्ण, १ डीओ, ५ पल्सर आदी दुचाकी गाड्या आणि १ रिक्षा यांचा समावेश आहे. दरम्यान आरोपी ऑनलाईन विक्रीसाठी असलेले वाहन कॉपी करून हुबेहूब त्याच गाडीसारखी दिसणारी गाडी चोरी करायचे यांनातर खऱ्या गाडीचे ऑनलाईन पेपर मागून घेत त्या कागदपत्राच्या आधारे बनावट पेपर बनवून त्याआधारे किंमत कमी करून या चोरलेल्या गाड्यांची olx वर विक्री करायचे या पद्धतीने हे आरोपी गुन्हे करत असल्याची माहिती कल्याण पोलीस सहआयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत