माय लेकीला मारहाण करुन चोरटे घरातील दागिने रोकड घेऊन पसार

Views: 497
शेअर करा:

कल्याण : माय लेकीला मारहाण  करुन घरातील ऐवज लुटून अज्ञात चोरटे फरार झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. दोन्ही महिलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून खडकपाडा पोलीस  या घटनेचा तपास करीत आहेत. कल्याणनजीक आटाळी येथे रविवारी रात्री हि धक्कादायक घटना घडली आहे.

आटाळी गावात राहणाऱ्या वत्सला चिकणे यांच्या शेजाऱ्याने माघी गणेशाची स्थापना केली होती. वत्सला यांची विवाहीत मुलगी सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत वत्सला यांच्या घरी माघी गणपतीला आली होती. काल रात्री गणेश विसजर्नानांतर आई आणि मुलगी, दोन मुलांसह घरी झोपल्या होत्या. मध्यरात्री आईला जाग आली तेव्हा तिने पाहिले की दोन लोक घरात शिरले आहेत. तिने आरडाओरड सुरु करण्याआधीच तिच्या डोक्यावर चोरट्यांनी मारहाण केली. या आवाजाने मुलगी सारिकाही जागी झाली. सारिकाने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी या दोघींना मारहाण करुन घरातील 13 तोळे दागिने आणि काही रोकड घेऊन पसार झाले.

या घटनेची माहिती खडकपाडा पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. खडकपाडा पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे. मात्र घरात घुसून दोन महिलांना जखमी करुन लुटमारीच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत