उपायुक्त अतुल पाटील यांची कल्याण शीळ रोडची पाहणी दरम्यान ८३०० रुपयांची वसुली 

Views: 542
शेअर करा:

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील यांनी काल अचानक कल्याण शीळ रोडची पाहणी केली. यावेळी उप मुख्य स्वच्छता अधिकारी ए. एल. घुटे, डोंबिवली विभागाचे उप मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, जे प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले, आय प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, स्वच्छता अधिकारी संदिप खिस्मतराव, मोहन दिघे, सुरेश सोळंके, राजेंद्र खैरे उपस्थित होते.

यावेळी पाहणी करताना रस्त्यालगत असलेल्या परिसरात काही ठिकाणी कचरा टाकल्याचे आढळून आल्याने या प्रभाग क्षेत्रातील कार्यरत २ सफाई कर्मचारी, १ मुकादम, १ स्वच्छता निरीक्षक व २ स्वच्छता अधिकारी यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच या ठिकाणी पडलेला कचरा त्वरीत उचलण्याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील यांनी संबंधितांना सुचना दिल्या. तसेच या परिसरात उघडयावर कचरा टाकणा-या व्यापारी, नागरीकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असून एकूण ११ व्यापारी, नागरीक यांच्याकडून एकूण ८३०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

जे व्यापारी, नागरीक उघडयावर कचरा टाकतांना निर्दशनास येतील अशा व्यापारी, नागरीक यांच्या विरुध्द घनकचरा व्यवस्थापन हाताळणी अधिनियम २०१६ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सर्व व्यापारी, नागरीक यांनी आपल्या दुकानात, व्यापाराच्या ठिकाणी, घरात निर्माण होणारा कचरा कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर टाकू नये व निर्माण होणारा विलगीकृत कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमध्ये देवून कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ व सुंदर राखणेकामी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत