विकासाची दूरदृष्टी असणारे लोकप्रिय खासदार

Views: 602
शेअर करा:

लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता चालवलेली व्यवस्था म्हणून लोकशाहीला अनन्य साधारण महत्व आहे. नागरिक समस्या असो किवा विकासाची कामे यासाठी खासदार, आमदार, नगरसेवक यांना निवडून दिले जाते. लोकांचे प्रतिनिधित्व संबंधित व्यक्ती संसद , विधी मंडळात तसेच पालिका सभागृहात करत असते. मात्र अल्पावधीतच आपल्या कामची छाप पाडणारे आणि विकासाची दूरदृष्टी असणारे म्हणून कल्याण लोकसभेचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडे पहिले जाते. 

२०१४ पासून त्यांचा सुरु झालेला राष्ट्रीय प्रवास आणि आजवर राहिलेली त्यांची संसदीय कार्य प्रणाली यामुळे सर्वसामान्य तरुणांत हवा हवासा वाटणारा लोकप्रतिनिधी म्हणून कायम  आपुलकीची राहिली आहे. 

पेशाने ऑर्थोपेडीक सर्जन म्हणून वैदयकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिंदेंची कारकीर्द २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कोंग्रेसचे उमेदवार आनद परांजपे आणि मनसेचे राजू पाटील यांना पराभवाची धूळ चारीत तब्बल २ लाख ५० हजारांच्या मतांच्या फरकाने  विजयश्री पटकावली. २०१४ ते २०१९ या ५ वर्षाच्या कारकिर्दीत सुरुवातीपासूनच आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवल्याने ते अल्पवादितच लोकप्रिय झाले. त्याचाच फायदा २०१९ च्या लोकसभेत झाला. प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे कॉंग्रेस चे बाबाजी पाटील यांचा पराभव करताना शिंदे ३ लाख ४४ हजार मतांच्या फरकाने निवडून आले. खासदार म्हणून कल्याण लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधी करताना कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणारा दिवा मुंब्रा कडील भाग येथील समस्यांवर विशेष भर राहिला. 

मध्य रेल्वेवरील पाचव्या व सहाव्या लाईनच्या काम मार्गी लागले. नागरिकांची पायपीट कमी होऊन लवकरात लवकर सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी डोंबिवली येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात त्यांनी सातत्याने घेतलेले परिश्रम कामी आले. डोंबिवलीसाठी घराघरात गॅस पाईपलाईन जोडणी प्रकल्प हे त्यांच्या गृहिणीचे बजेट थोडे कमी करण्याच्या विचाराने उचलले पाऊल होते. डोंबिवलीतील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करण्यासाठी निधीची भरघोस व्यवस्था  त्यांनी करण्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही. शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये अल्प दरात मुंबईतील हॉस्पिटलच्या धर्तीवर एक्सरे, रक्त तपासणी, एम. आर. रे, लहान मुलांसाठी बालरोगतज्ञ विभाग सुरु केले. शिळ रोडचे सहा पदरीकरण करण्यासाठी सततचा पाठ पुरावा. बी.एस.यु.बी च्या रखडलेल्या प्रकल्पात बधित रहिवाश्यांना प्राधान्याने घर देण्यासाठी अथक प्रयत्न. वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैदकीय मदत कक्षाच्या माध्यमातून डोंबिवलीतील असंख्य गोर गरिबांना मोफत उपचार व मदत मिळवून दिले. तसेच सातत्याने होणाऱ्या मोफत महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य विषयी तपासण्या आणि मोफत औषधे व चष्मा यांचे वाटप होत असते. डोंबिवलीतील मनाचा तुरा ठरलेला १५० फुटी तिरंगा ध्वज हा खासदार साहेबांच्या प्रयत्नातून डौलाने फडकला. पत्रीपूल आणि मानकोली ब्रिजचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यामागे खासदारांचे विशेष योगदान होते हे सर्वश्रुत आहे. कोविड काळात कोविड सेंटर उभारणी, औषधे व लसींचा पुरवठा करणे, पॅरा मेडिकल स्टाफ डॉक्टर्स/नर्स यांची उपलब्धता करून देण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता.  तसेच कोविड काळात पॅरा मेडिकल स्टाफ, पोलीस, साफ सफाई कर्मचारी यांच्या भोजनाची व्यवस्था आणि आरोग्य तपासणी नित्य नियमाने करण्यासाठी खासदार साहेब प्रयत्नशील होते. शिवाय गोर गरिबांना, रिक्षा चालक, मोल मजुरी करणारे मजूर, बॅक स्टेज आर्टिस्ट, पूजा सांगणारे पुरोहित यांना अन्न धान्याचा पुरवठा कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. डोंबिवलीतील बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून शासनाच्या माध्यमातून  सरकारलाच रोजगार घेऊन स्वतः च्या मतदार संघात यायला भाग पडले आणि एकाच दिवसात २२०० जणांना  नोकरी मिळवून दिली उल्हासनगर मध्ये कामगारांसाठी अद्यावत रुग्णालय, अंबरनाथ मध्ये शुटींग रेंजची उभारणी, ठाकुर्ली पादचारी पुलाचे बांधकाम, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारा रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात आला. कल्याण डोंबिवली टिटवाळा पर्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाचे पूर्णत्वाकडे सुरु असलेले काम त्यांच्या कार्याची पोचपावती ठरली आहे. 

२०२० मध्ये मोलाचे योगदान

मार्च २०२० पासून नव्यानेच आलेल्या महामारीबाबत संपूर्णत: संधिग्धता असताना शिंदे यांनी त्यांच्या मतदार संघातील आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली. नागरिकांची सेवा सक्षम करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली. नागरिकांची सेवा करताना त्यांना दोन वेळा कोरोनाची बाधा झाली. मात्र न डगमगता त्यांचे कर्तव्य त्यांनी सुरूच ठेवले. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमध्ये जम्बो कोव्हीड सेंटर उघडून कसे बेड उपलब्ध होतील, रुग्णांना त्वरित औषधोपचार कसे मिळतील याकडे त्यांचा कटाक्ष होता. 

डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे काम एक लोकप्रतिनिधी तसेच पक्षाचा वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मला जवळून पाहायला मिळाले. एकदा विकासाचे काम हाती घेतल्यानंतर ते तडीस नेण्यासाठी त्यांच्याकडून होत असलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे”. हाती घेतलेले काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेणे, नागरिकांची समस्येतून सुटका होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळेल यासाठी त्यांची तळमळ सातत्याने जाणवते. विकासकामांसाठी त्यांचा असलेला दृष्टीकीन भावणारा असून त्यांच्या पुढील कार्याला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तसेच समस्त बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

श्री. राजेश गोवर्धन मोरे

डोंबिवली शहर प्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत