शहर विद्रुपीकरणात भर घालणाऱ्या बॅनर्स‍वर केडीएमसीची कारवाई

Views: 426
शेअर करा:

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त  यांनी यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार, शहर विद्रुपीकरणात भर घालणारे बॅनर्स काढण्याची कारवाई विविध प्रभागांच्या सहा.आयुक्तांमार्फत सातत्याने सुरूच असुन या कारवाईमध्ये अ प्रभागाचे सहा.आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी  टिटवाळा मार्केट चौक येथील ५५ लहान-मोठे बॅनर्स काढण्याची कारवाई केली. हि कारवाई फेरीवाला पथक कर्मचारी व १ जेसीबीच्या मदतीने करण्यात आली. 

त्याचप्रमाणे ब प्रभागातही सहा.आयुक्त राजेश सावंत  यांनी  माधव संकल्प – निकी नगर – वायले नगर – खडकपाडा, सिनेमॅक्स येथील ४९ लहान-मोठे बॅनर्स  काढण्याची कारवाई केली.  क प्रभागाचे सहा. आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी  आधारवाडी जेल – लालचौकी – दुर्गाडी देवी परिसर – आग्रा रोड वरील १५४ लहान मोठे  अनधिकृत बॅनर्सवर कारवाई केली. हि कारवाई फेरीवाला पथकामार्फत करण्यात आली. 

तसेच ड प्रभागात सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी कल्याण (पूर्व) खडेगोळवली – पुनालिंक रोड वरील ५० लहान-मोठे अनधिकृत बॅनर्स  काढण्याची कारवाई केली. 

ग प्रभागात सहा. आयुक्त संजय साबळे यांनी २५ लहान – मोठे अनधिकृत बॅनर्स काढण्याची कारवाई केली. 

  तर आय प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी पिसवली गाव येथील ५५ लहान – मोठे अनधिकृत बॅनर्स  काढण्याची कारवाई केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत