शहाड येथिल सेंच्यूरी कंपनीत ब्लास्ट; दोन कामगारांचा मृत्यु, अनेक जखमी

Views: 456
शेअर करा:

कल्याण : कल्याण नजिक असलेल्या शहाड परिसरात सेंच्युरी कंपनीमधील CS२ या डिपार्टमेंटमध्ये शुक्रवारी अकारा ते बारा वाजण्याच्या सुमारास जोरदार ब्लास्ट झाला. यात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून या घटनेत अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती कंपनीच्या विश्वस्थानी दिली आहे. या जखमी कामगारांना सेंच्युरी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हा ब्लास्ट कशामुले झाला याची माहि!ती अद्याप मिळालेली नाही.

    कंपनीत झालेला ब्लास्ट भयंकर आणि भीषण होता. त्यामुळे तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर परिसरातील घरांना हादरे बसले आहेत. यानंतरच ही सर्व घटना समोर आली. या ब्लास्टमध्ये कंपनीत काम करणारे अनेक कामगार जखमी झाले आहेत. या सर्वांना सेंच्युरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या कंपनीत अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य सुरू आहे. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत