सर्वेमध्ये मविआकडे कल दिसल्याने महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी फोडली – रोहित पवार  

Views: 459
शेअर करा:

कल्याण भाजपाने महाराष्ट्रात केलेल्या सर्व्हे नुसार महाविकास आघाडीचे 28 खासदार निवडून येणार असल्याचे चित्र दिसल्याने एकनाथ शिंदे यांना जवळ केलं. शिवसेनेला फोडलं, शिंदे सत्तेत आले. तरी देखील त्यांनी राष्ट्रवादी फोडली, कुटुंब फोडलं. एकनाथ शिंदे भाजपा सोबत गेल्या नंतर पुन्हा सर्वे करण्यात आला त्यात महाराष्ट्रात कमी खासदार निवडून येण्याचे चित्र दिसले म्हणून राष्ट्रवादी पक्ष देखील फोडला असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी केली. त्यांनी शरद पवार यांना डिवचलं असून त्याचे परिणाम भोगावे लागतील. एवढं करून देखील त्यांचा आकडा पूर्ण होत नसल्याचे त्यांनी यावेळी संगीतले.

जुडेगा भारत जितेगा इंडिया या शीर्षकाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  नेते आमदार  रोहित पवार यांची आज कल्याणमध्ये  महाविकास आघाडीची सभा कल्याण पश्चिमेतील स्प्रिंग टाईम क्लब येथे आयोजीत करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या सभेचे  आयोजन करण्यात आले होते.  यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते  महेश तपासे, विकास लवांडे, वंडार पाटील, सारिका गायकवाड, संदिप देसाई,   प्रकाश तरे, किरण शिखरे, राज जोशी, प्रशांत माळी,  काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, ब्रिज दत्त, कांचन कुलकर्णी, शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे, आपचे जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड आदींसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

तर कल्याणला यायला निघताना गुगल मॅपवर ट्राफिकमुळे जास्त वेळ दाखवल्याने लोकलने आलो. यावेळी लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे जिल्हयाच्या रस्त्यांची आणि वाहतुकीची अवस्था दयनीय असून लोकसभेत आणि आमदारकीला बदल झाला पाहिजे असे सांगत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना  रोहित पवार यांनी सांगितले कि, भाजपा संविधान बदलण्याचा प्रयर्न करत आहे. मुद्दामून संविंधनाला डीवचण्याचे काम सुरू आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आणि पक्ष फोडण्यासाठी इलेक्शन कमिशनचे प्रमुख महत्त्वाचे असल्याने सिलेक्शन कमिटीमध्ये मंत्र्यांना घुसवलं गेलं याच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत.

मागच्या निवडणूकित एनडीए मध्ये भाजपाने मित्र पक्षांना विचारलं नव्हतं मात्र आता एका एका खासदाराला देखील चर्चा करण्यासाठी बोलवलं जात आहे कारण इंडिया आघाडीची त्यांना भीती वाटते. असे असले तरी आपल्याला देखील एकत्र येऊन लढावं लागेल. काही नेते आमदारांना कारवाईची धमकी दिली जाते. येत्या काळात नवीन चेहऱ्यांना संधी असून निष्ठावंत कार्यकर्त्यांसह नवीन कार्यकर्ते नगरसेवक बनू शकतात.  

भाजपाला मुंबईवर राज्य करायचं आहे. त्यांना मुंबईवर जरी राज्य करायचं असलं तरी लोकांच्या मनावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्य करत आहेत. मराठी माणसे स्वाभिमानी असतात या स्वाभिमाना मुळेच मराठी माणूस दिल्ली पुढे झुकत नाही. महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले. यामुळे अनेकांचे रोजगार हिरावले. भाजपाच्या केंद्रीय नेत्यांना खुश करण्यासाठी आपल्या राज्यातले प्रकल्प बाजूच्या राज्यात गेले.

उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा सत्तेत जाण्याची संधी होती, शरद पवार यांच्याकडे निवृत्त होण्याची संधी होती पण त्यांनी तसं केलं नाही. राहुल गांधी यांनी जी पदयात्रा काढली त्यामुळे बरेच परिवर्तन झालं आहे. बीआरएसला त्यांच्याच राज्यात पराभवाची भीती वाटत असल्याने त्यांनी आता महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं आहे. आगामी काळात संघर्ष सोपा नसून जिंकण्यासाठी लढायचं असल्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. 

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत