Views: 2616
शिक्षकांसाठी ११६० कोटींचं पॅकेज : ६० हजार शिक्षकांना होणार फायदा
कल्याण : राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने ११६० कोटीच पॅकेज जाहीर केले असून ६० हजार शिक्षकांना न्याय दिला आहे. भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानून केला तातडीने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी केली आहे.
मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत या शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यांच्यासाठी १ हजार १६० कोटींचे पॅकेज राज्य शासनाने जाहीर केले आहे. अघोषित शाळांना घोषित करावे तसेच २० टक्के व ४० टक्के शाळांना पुढचा टप्पा घोषित करावा यासाठी शिक्षकांचे आझाद मैदानात ४० दिवसापासून आंदोलन सुरू होते. या बाबत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे व प्रदेश सदस्य बयाजी घेरडे सुभाष अंभोरे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन अनुदानाची मागणी केली होती.
आमदार रामनाथ मोतें ची आठवण
विनाअनुदानित शाळांना अनुदान देत असल्याचा शासन निर्णय जाहीर केल्याशिवाय मंत्रालयातून उठणार नाही. अशी भूमिका घेत माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते व अनिल बोरनारे यांनी घेऊन मंत्रालयाच्या व्हरांड्यात ठिय्या आंदोलन केले होते. अखेर शासनाला नमवत २०१६ मध्ये १९४ कोटी रुपयांचे अनुदान देण्यास सरकारला भाग पाडले होते. अश्या शिक्षक आमदारांची शिक्षण क्षेत्राला गरज असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.



