श्रीहरी पवळे यांचा अमलताश प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन 

Views: 383
शेअर करा:

कल्याण : कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालयातील कलाशिक्षक श्रीहरी पवळे यांचे वल्लरी मीडिया प्रस्तुत वल्लरी प्रकाशन द्वारे प्रकाशित प्रातिनिधिक  काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह सदाशिव पेठ पुणे येथे सोमवारी झाले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग. भा. चव्हाण, प्रमुख पाहुणे भूषण कटककर, प्रभा सोनवणे, डॉक्टर वैशाली मोहिते, मानसी चिटणीस, संपादक वेंकटेश कल्याणकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम सत्कार प्रसंगी श्रीहरी पवळे यांनी माय माऊली ही कविता सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. याच कार्यक्रमात शुभांगी रेवतकर यांचा मुक्त मी व्यक्त मी या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन झाले. महाराष्ट्रातून आलेले कवी आणि कवयित्री  सहभागी झाले होते. श्रीहरी पवळे, मुकुंद आठवले, अमेय बाळ, मृणाल देशपांडे, रजनी दिवेदी जयदीप वैद्य, क्षमता प्रकाश, मृणाल जैन, साधना शेळके, जयश्री महाजन, माणिक कौलगुड, सविता क्षीरसागर, शुभांगी उदगावकर, कल्याणी भाले हे सर्व कवी कवयित्री उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया कल्याणकर यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन करून कार्यक्रमात बहर आणला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग. भा. चव्हाण यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत