सकल भारतीय समाजाच्या वतीने कल्याणमध्ये हजारोंच्या संख्येने मोर्चा 

Views: 573
शेअर करा:

कल्याण : दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी यांच्या मनात शासनाविरोधात असलेला राग व्यक्त करण्यासाठी कल्याणात सकल भारतीय समाजाच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून प्रांत कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात समाजातील निरपराध तरूणांवर केलेल्या हल्ल्यातील आरोपीचा शोध घ्या, अत्याचार रोखन्यास असमर्थ ठरलेल्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या आणि जातीय धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीनं देशद्रोही जाहीर करा यासारख्या आग्रही मागण्या करण्यात आल्या. 

     कल्याण येथील अल्पवयीन मुलावर झालेला हल्ला, नांदेड येथील अक्षय भालेराव खून, मुंबई येथील वस्तीगृहात विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा खून, लातूरचा गिरधारी तपलाघे खून अशाप्रकारे सतत खून बलात्कार, हल्ले घडण्याचे कटकारस्थान महाराष्ट्रात सुरूच आहेत. हे पुरस्कृत अत्याचार मालिका थांबवण्यासाठी कल्याणात सकल भारतीय समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यात हजारोंच्या संख्येने नागरिक  सहभागी झाले होते. या मोर्च्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून सुरवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, काळा तलाव, बेतूरकर पाडा, खडक पाडा ते प्रांत कार्यालयात जाऊन धडकला.   

दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी यांच्या मनात शासनाविरोधात असलेला राग या मोर्च्याच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. संपूर्ण देशात विशेषतः महाराष्ट्रात आर एस एस पिढीत सरकारने समजा समाजामध्ये विकृष्ठ निर्माण केले आहे. धर्मंदांचे जहर पसरवला आहे. आज मणिपुर पेटला आहे. हे सरकार असच राहिले तर देश पेटेल. हे मानुवादांचे, विषमतेचे सरकार आहे. तमाम जनतेने एकत्र येऊन हे सरकार हटवले पाहिजे तरच अन्याय अत्याचार थांबेल अशी कळकळ कामगार नेते श्याम गायकवाड यांनी व्यक्त केली. 

तर आगरी कोळी समाज ऐक्यासाठी मोर्च्यात सहभागी झाला आहे. फेक न्यूज पासरविणार्या खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याची मागणी आगरी कोळी समाजाकडून होत असल्याची प्रतिक्रिया आगरी कोळी नेते राजाराम पाटील यांनी दिली. 

या मोर्च्यात कामगार नेते शाम गायकवाड, राजाराम पाटील, सुरेश पाटील, ॲड. किरण चन्ने, बाळाराम कराळे, ॲड. जय गायकवाड, अजिंठा फाउंडेशनचे अजय सावंत, सुबोध मोरे, अण्णा रोकडे, भीमराव डोळस, महादेव रायभोळे, सुनील खांबे, बाबा रामटेके, अण्णा पंडित, राजू रणदिवे, संदीप जाधव, महेंद्र गायकवाड आदींसह ठाणे, रायगड जिल्ह्यामधील अनेक बौद्ध, आगरी, कोळी बांधव सहभागी झाले होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत