Views: 453
कल्याण : गणेशोत्सवाची सध्या सर्वत्र धूम सुरू असून घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तगण आपल्या लाडक्या बाप्पाची पूजाअर्चा करत आहेत. मात्र हा उत्सव साजरा करतांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने कल्याण मधील बेतूरकरपाडा येथे राहणाऱ्या यादव कुटुंबीयांनी चक्क शेणापासून गणपतीची मुर्ती साकारली आहे.
यादव कुटुंबीय हे गेल्या आठ वर्षापासून गणेशोत्सव साजरा करत असून दरवर्षी ते पर्यावरणपूरक गणपतीची मुर्तीची स्थापना करत असतात. यंदा देखील त्यांनी शेणापासून मुर्ती साकारली असून मुर्ती बनविण्यासाठी शेणासोबत माती देखील वापरली आहे. या पर्यावरण पूरक मुर्तीसोबतच त्यांनी चांद्रयानचा देखावा देखील साकारला असून हा देखावा पुठ्ठे आणि कागदांच्या मदतीने सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाच दिवस गणारायाची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर घरच्या घरीच एका बादलीमध्ये या मूर्तीचे विसर्जन करून विरघळलेली हे शेण आणि माती खत म्हणून चाळकऱ्यांना खत म्हणून वाटत असल्याची माहिती निकलेश यादव यांनी दिली.



