सामान्य जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्याचे काम केल्यानेच भाजपाला मोठे यश – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

Views: 363
शेअर करा:

कल्याण : महाराष्ट्रात 288 जागी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 236 ठिकाणी भाजपने निवडणूक लढवली असून त्यामध्ये भाजपने 134 ठिकाणी भाजपाने महाविजय मिळवला असून भाजप हा तळागाळापर्यंत पोहचलेला पक्ष आहे. भाजपचा कार्यकर्ता हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असल्यानेच इतके मोठे यश भाजपाच्या पदरात पडले अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. कल्याण पश्चिमेतील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्याला ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह मंडल अध्यक्ष, माजी नगरसेवक, इतर पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक, विशेषतः भगिनी वर्ग उपस्थित होते.

पंधरा तारखेला होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून जिल्हाभरात कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक भागात कार्यकर्त्यांना निवडणूक तयारीसाठी सज्ज करण्यासाठी हे मेळावे घेतले जात आहेत. डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिम या भागांमध्येही कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना वेळ देणे, त्यांना चार्ज करणे आणि थेट संवाद साधणे अत्यंत गरजेचे असल्याने या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

सध्या महाराष्ट्रात २८८ ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. यापैकी २३६ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यापैकी १३४ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, हे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे द्योतक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भाजप ही तळागाळात काम करणारी आणि गावोगावी, बूथ लेव्हलपर्यंत संघटन मजबूत करणारी पार्टी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार “महाराष्ट्रात ५१ टक्के लढाई आपल्याला जिंकायची आहे” या भूमिकेनुसार मॅन-टू-मॅन संपर्कावर विशेष भर देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपकडून प्रभावीपणे सुरू असून, त्याचा सकारात्मक परिणाम निवडणूक निकालांमध्ये दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही भागांत बूथ लेव्हलवर केलेले नियोजन, कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासाचे व्हिजन लोकांना पसंत पडले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत