Views: 507
कल्याण : देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेसाठी ६ हजार ५०० कोटींचे आश्वासन दिले होते. त्याचे पुढे काय झाले? एकही पैसा कल्याण डोंबिवलीत खर्च केला नाही. इथल्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी हा पैसा लुटण्याचेच काम केल्याची टीका कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कल्याणमध्ये केली. कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिरात काँग्रेसच्या वतीने भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. या मेळाव्याला पाटोलें सह सरचिटणीस राजन भोसले, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, इंटक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश मुथा, महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, ब्रिजकिशोर दत्त, जयनारायण पंडित, आर. बी. सिंग, शकील खान, कांचन कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पटोले यांनी या देशामधील लोकशाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान टिकवायचे असेल तर देशामध्ये काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाहीये. तर भाजपला देशातील जनतेशी काहीही देणे घेणे नसल्याचेच त्यांच्या निती आणि धोरणांवरून दिसून येत आहे. भारताला जगामध्ये बलशाली बनवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केलं असून आम्हीच निर्माण केलेल्या मालमत्ता विकून मोदी सरकार देशाला खड्ड्यात घालत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
गेल्या काही आठवड्यांचा विचार केला तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकापाठोपाठ एक सामाजिक तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांचा एकत्रित विचार केला असता, त्या घडवून आणल्या जात असून मणीपूरसारखी अशांतता महाराष्ट्रात पसरवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप पटोले यांनी केला. तर देशात निर्माण झालेले महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आदी प्रश्नावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आपल्याला भांडवले जात आहे. कर्नाटकमधील विजयाने लोकांच्या मनात हा विश्वास निर्माण केला आहे की काँग्रेसच महागाई कमी करू शकते, काँग्रेसच गरिबांना न्याय देऊ शकते. त्यामुळेच तर सर्व जाती धर्मातील सर्वाधिक मते काँग्रेसला मिळाल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.
पहिली जाहिरात दाढीवाले बाबांची आली. त्यानंतर आठ दिवसांनी नागपूरचे मी पुन्हा येईन वाले यांची जाहिरात आली. त्यात दाढीवाले बाबांचे ५० पैकी १५ आमदार निवडून येतील असे म्हटले होते. या जाहिरातीवरुन दाढीवाले बाबांचा कार्यक्रम ठरला आहे, असे सूतोवाच प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी यावेळी केले. तर साहेबांचं बंड यशस्वी झालं नसतं तर ते त्याचवेळी डोक्यात गोळी घालून घेणार होते, असे वक्तव्य शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी केलं, या प्रश्नावर कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कोणाचं लालच काय असेल, या लालचाचीच उदाहरणं ते लोक सांगतात. मी झालोच नाहीतर गोळी मारून टाकीन, हे त्यांचेच मंत्री सांगत आहेत.


